सेव और सोल्स संस्थेकडून कोविड मध्ये मृत्यू झालेल्या 177 कुटुंबातील व्यक्तींना पालक मंत्री देशमुख यांच्या हस्ते अन्नधान्य किटचे वाटप

0
471

लातूर, दि.30 अनिल कोकने

:- जिल्ह्यात covid-19 मुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी 176 कुटुंबातील आई किंवा वडील या पैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. तर एका मुलाचे आईचा मृत्यू पूर्वी झालेला होता तर वडिलांचा मृत्यू कोविड मुळे झालेला आहे अशा एकूण 177 कुटुंबांना शेव और सोल्स(एसओएस) या सामाजिक संस्थेकडून अन्नधान्य कीट देण्यात आले. या किटचे वितरण पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाले.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पवार, SOS संचालक मिरा सिंह, ॲड. किरण जाधव, समद पटेल सह अन्य मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते.
कोविड मुळे मृत्यू पावलेल्या 177 एकल कुटुंबातील व्यक्तींना 2 हजार किमतीचे कोरडे अन्नधान्य वाटप करण्यात येत असून या संस्थेच्या वतीने या कुटुंबातील महिलांचे समुपदेशन करण्यात आलेले आहे. तसेच यापैकी संजय गांधी निराधार योजनेतून अकरा लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले असून अठरा वर्षांपुढील चाळीस मुलांचे
दत्तकत्व संस्थेने घेतल्याची माहिती दिली, महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती पवार यांनी दिली.
यावेळी एसओएस च्या संचालिका मीरा सिंह यांनी एसएस सामाजिक संस्थेकडून आज पर्यंत जिल्ह्यातील दोनशे मुलांचा सर्वांगीण विकास करून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगितले. सद्यस्थितीत या संस्थेकडे 102 मुले असून त्यांचे योग्य पालन पोषण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थेच्या वतीने मुलांसाठी विलगीकरण कक्ष तयार केला असून या कक्षात 50 बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
प्रारंभी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मनीषा संजय खंडागणे, हेमांगी स्वामी, संगीता जाधव राजकुमार पांचाळ यांना प्रातिनिधिक स्वरूपात अन्नधान्याचे वितरण करण्यात आले.

महापालिकेचे 23 रोजंदारी कर्मचारी झाले कायम
लातूर शहर महानगर महानगरपालिकेकडे काम करणारे तेवीस रोजंदारी कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायम झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते महापालिकेने त्यांच्या सेवेत कायम केल्याचे आदेश प्रधान करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here