चराठा ओटवणे येथे लवकरच कोविड लसीकरण केंद्र चराठा आणि ओटवणे गावात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी चराठा सरपंच बाळू वाळके, उपसरपंच जॉनी फेराव ओटवणे सरपंचा उत्कर्षा गावकर यांनी सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांचे लक्ष वेधले असता निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोविड लस उपलब्ध होताच तात्काळ दोन्ही गावात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची करण्याची ग्वाही दिली.