*केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या मुक्ताईनगर तालुक्याच्या कार्यकारणीने कु-हा-काकोडा येथे २०० मास्क व रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले*
मुक्ताईनगर
केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली मुक्ताईनगर तालुका कार्यकारणीच्या वतीने नुकतेच कु-हा- काकोडा येथील जिल्हा बँकेच्या समोर आणि सेंट्रल बँक समोर २०० मास्क तसेच ४० गरजु रुग्णांना रोग प्रतिकार शक्तीं वाढवणाऱ्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष श्री विनोद पाटील मुक्ताईनगर तालुका सहसचिव श्री किशोर कासार मुक्ताईनगर तालुका कार्याध्यक्ष श्री संदीप गोंधळी मुक्ताईनगर तालुका कार्यालयीन सचिव श्री अनंता सोनार मुक्ताईनगर तालुका संघटन सचिव श्री विजय गोरले मुक्ताईनगर तालुका महासचिव श्री कैलाशभाऊ कोळी मुक्ताईनगर तालुका सहसचिव श्री अमोल गावंडे सर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रसंगी तालुका संघटन सचिव श्री विजय गोरले यांनी केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या या उपक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली ते म्हणाले आमचे राष्ट्रीय संघटन सचिव श्री शिवचरण उज्जैनकर सर यांच्या मार्गदर्शनाने जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर, यावल, भुसावल, बोदवड, जळगाव त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, खामगाव, चिखली मेहकर आदी विविध ठिकाणीसुद्धा केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मास्कचे वाटप तसेच पानपोई आणि रोग प्रतिकार शक्तींच्या गोळ्यांचे मोफत वाटप सुद्धा करण्यात आलेले असल्याचे गोरले यांनी नमूद केले. यावेळी या कोरोना महामारीतील या भयावह परिस्थिती सर्वांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून वेळोवेळी साबणाने स्वच्छ हात धुणे, मास्कचे वापर करण्यात यावे त्यामुळे आपण कोरोनाला लांब ठेवू शकतो असेही प्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाबद्दल केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंदजी दहिवले तथा राष्ट्रीय संघटन सचिव श्री शिवचरण उज्जैनकर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री संजु भटकर उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री राजेश पोतदार उत्तर महाराष्ट्र संघटन सचिव श्री भागवतसेठ राठोड उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री राजेश सैनी तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ.अजय पाटील जळगाव जिल्हा सचिव प्रा. राजकुमार कांकरिया आदींनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.