महिला अन्याय-अत्याचार विरोधी दक्षता कोर कमिटी जाहिर

0
555

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रीक्स ह्युमन राईट्स मिशन चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपबाबा पाटील खंडापुरकर तसेच राष्ट्रीय महिला अध्यक्षा कविताताई रायजादा यांनी महिलांवरील तसेच २, ५, १० वर्षाच्या कोवळ्या मुलिंवर होणारे वाढते अन्याय-अत्याचार, बलात्कार यावर काम करण्यासाठी एक ठोस निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रीक्स ह्युमन राईट्स मिशनच्या माध्यमातून आपण एक महिला कमिटी तयार करत आहोत. या कमिटीचे नाव असेल “महिला अन्याय-अत्याचार विरोधी दक्षता कोर कमिटी” या कोर कमिटीत असणा-या महिलांना समितीच्या वतिने काही विषेश अधिकार दिले जातील. “महिला अन्याय-अत्याचार विरोधी दक्षता कोर कमिटीतील महिला” दारू, गांजा, मावा, गटखा, तसेच महिलांवरील व २, ५, १० वर्षाच्या कोवळ्या मुलिंवर होणारे वाढते अन्याय-अत्याचार, बलात्कार अश्या दृष्ट प्रवृत्तीचा या कमिटीच्या माध्यमातून महाष्ट्रभर फिरून प्रत्यक्ष घटणास्थळी जाऊन समुळ नष्ट करतील. व राष्ट्रीय कमिटीवरील मेंंबर यांना या महिला कमिटीच्या वतीने प्रत्येक प्रकरणी रिपोर्ट केला जाईल.
महिला अन्याय-अत्याचार विरोधी दक्षता कोर कमिटी” ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रीक्स ह्युमन राईट्स मिशन ला संलग्न असेल. यात किमान १० महिलांचा सहभाग असेल, या महिला कमिटीची आजून एक खाशीयत असेल ती म्हणजे कमिटीचे काम करत असताना प्रत्येक महिलेला लिड घेऊन काम करण्याची संधी दिली जाईल. म्हणजे महिलांना प्रत्येकवेळी येणारे वेगवेगळे अनुभव आणि त्या परिस्थीतीत कोणाला कसे हँडेल करायचे हे प्रत्येक्षातील अनुभव अनुभवायला मिळतील, त्यामुळे महिलांवरील होणारे अन्याय-अत्याचार तसेच वाढते बलात्कार या विरोधी काम करण्याचा अनुभव महिलांना मिळेल व त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
याकामी कमिटीत कायदेशीर सल्लागार म्हणून आपल्याच समितीची एक महिला भगिनी वकील असेल, एकत्र मिळून या महिला कमिटीचे कामकाज चालेल. या कमिटीचा एक स्वतंत्र ग्रृप असेल, यावर फक्त आणि फक्त कामाविषयी चर्चा केली जाईल. आणि कमिटीच्या हाती आलेल्या प्रकरणात जातीने लक्ष दिले जाईल. तसेच प्रत्येक प्रकरणाला १००% न्याय देण्याचा प्रामाणीकपणे प्रयत्न केला जाईल. या कमिटीच्या ग्रृपला फक्त राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपबाबा पाटील खंडापुरकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष सलिमभाई शेख, राष्ट्रीय महिला अध्यक्षा कविताताई रायजादा तसेच राष्ट्रीय समन्वयक गिरीराज महिराश हे जोडले जातील.

“महिला अन्याय-अत्याचार विरोधी दक्षता कोर कमिटीत” असणा-या महिलांची नावे पुढील प्रमाणे
१) प्रदेश अध्यक्षा:- सोनालीताई गुळभेले मो. नं. 9156866691
२) प्रदेश मुख्य संयोजक:- सुनिताताई कसबे, मो. नं. 9011865442
३) प्रदेश उपाध्यक्षा:- शोभाताई बल्लाळ, मो. नं. 9860634764
४) प्रदेश मुख्य समन्वयक:- राणीताई स्वामी, मो. नं. 8830801996
५) प्रदेश संघटक:- सारिकाताई महाला, मो. नं. 8975837361
६) प्रदेश सरचिटणीस:- पुजाताई मिसळे, मो. नं. 9370659608
७) प्रदेश सचिव:- सुनिताताई कुरमवंशी, मो. नं. 8275418919
८) प्रदेश सेक्रटरी:- सोनालीताई ठाकरे, मो. नं. 7420058077
९) प्रदेश कार्याध्यक्ष:- सनाताई शेख, मो. नं. 9673564447
१०) प्रदेश संघटक सचिव:- प्रिती काकडे, मो. नं. 7709843227

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here