सामाजिक आणी राजकीय कार्या मुळे कधीच परिवाराला वेळ दिला नाही, तब्बल 41 वर्षा नंतर सख्ये भाऊ दिलीप पाटील खंडापुरकर यांची आज भेट झाली. प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष
1972 साली विधार्थी दशेपासुनच सामाजिक कार्यास सुरुवात केली, पहील्याच आंदोलनात 25 ऑगस्ट साल 1972 रोजी SRP च्या गोळीबारात वाचलो. पण लाठी चार्ज मध्ये सापडलो आणी 40 ते 50 SRP सतत लाठीने मारत होते.यात एक पाय पुर्ण पणे निकामी झाला.या मुळे शिक्षणा वरील मन ऊठले,पुर्ण वेळ सेवा दल, समाजवादी पक्षाच्या कार्यास वाहुन घेतले
जार्ज फर्नांडिस, एस.एम.जोशी, भाई वैध, ना.ग गोरे,मधु लिमये, बापु काळदाते यांच्या तालमीत घडलो, आणीबाणीत जेल,आनेक वेळेस जेल भोगली, 1977 साली बिहार ला गेलो, प्रचंड बिझी झालो, नातेवाईकांची भेट होत नसायची, 1980 साली माझे मोठे भाऊ दिलीप पाटील खंडापुरकर यांची भेट झाली, गेली 41 वर्ष मशीन सारख फिरत गेलो, कधीच कुटुंबाचा विचार केला नाही, माझे भाऊ लातुर मध्ये आसुनही त्यांची माझी भेट होवु शकली नाही. आज मोठ्या भावाची तब्बल 41 वर्षांनी भेट झाल्याने सर्व कुटुंबीय आनंदाने सुखावले, मी आज भावाच्या घरी मुद्दामच गेलो, कोरोना मुळे कधी काय होईल सांगता येत नाही, पुन्हा हुरहुर वाटु नये या साठी आज भावाची भेट झाली, या वेळेस लहान भाऊ राजु पाटील खंडापुरकर हे ही भेटले, मी केलेली चुक आपण करू नका, माझ्या काळातले, राजकारण, समाजकारण वेगळे होते,आज तो त्रास नाही, गेली 49 वर्ष कसे गेले कळलेच नाही. तरी आपण आपल्या कुटुंबीयांना भावा,बहीनीना भेटत चला. प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष