सिंधुदूर्ग,आंबोली
आंबोली, हिरण्यकेशी जंगलात वन खात्याने लावलेल्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ कैद झाला आहे..
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, हिरण्यकेशी येथील जंगलात वन खात्याने लावलेल्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघाचे स्पष्ट दर्शन झाले आहे..
हिरण्यकेशी हा भागात मुबलक पाणी, घनदाट जंगल असल्याने जंगली प्राण्यांचा वावर असतो. दोन दिवसा पूर्वी एका शेतकऱ्याच्या गायीचा वाघाने फडशा पाडला होता. आणि पट्टेरी वाघ असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला होता..
राज्य सरकारने सह्याद्री मधील ८ वन क्षेत्रांना राखीव दर्जा दिल्याने वाघाचा भ्रमण मार्ग सुरक्षित होणार असल्याचे मुख्य वन सौरक्षक डॉ व्ही. क्लेमंट बेन यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले..
⭕ महेश लाखे🎧न्युज औंन सिंधुदुर्ग⭕