लातूर, प्रतिनिधि जनार्धन भावे
कोविड१९ प्रादुर्भाव आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन लातूर महानगरपालीकेच्या वतीने ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान परिसरात जम्बो कोवीड सेंटरची उभारणी करण्यात आली असून आज या ठिकाणी जाऊन तेथील एकूण व्यवस्थेची पाहणी केली.
प्रारंभी या ठिकाणी ६० ऑक्सिजनेटेड सह एकूण १०० बेडची व्यवस्था उभारण्यात आली आहे लवकरच येथे २० व्हेंटिलेटरची व्यवस्था केली जाणार आहे. या सेंटरमध्ये स्वतंत्र स्त्री, पुरुष कक्ष उभारले असुन रूग्णवाहीका, नास्टा, जेवण, पाणी या सुविधाही पुरवल्या जाणार आहेत.
यावेळी मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे, ॲड. दीपक सूळ, जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, लातूर शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव, समद पटेल उपस्थित होते.