प्रतिनिधि, राजेन्द्र मगर, लोनी
तळागाळीत जनतेसाठी सतत झटणारे ,काेणत्याही प्रकारचा मान ,सम्मान ,पदाची अपेक्षा न करता सतत गाेरगरीबांच्या सेवेत हजर राहणारे सतत दुसऱ्यांसाठी निस्वार्थ पने झटणारे गाेर गरीबांचे कैवारी काेल्हेवाडी गावचे सर्वाचे लाडके आदरणीय स्व.भास्करराव (आप्पा) दिघे यांच्या विचारांची प्रेरणा पुढे चालत राहुन त्यातुन कायम गाेर गरीब गरजुंची सेवा घडावी या उद्देशाने त्यांचे चिरंजीव राहुलशेठ दिघे यांच्या मदतीने आप्पांच्या स्मरणार्थ आप्पा फौंडेशन (काेल्हेवाडी)ची स्थापणा करण्यात आली यांच्या वतीनेcovid 19 या संकटमय काळात रुग्णांना तसेच रुग्णालयातील नातेवाईक कोरोना योद्धे यांच्या साठी मोफत भोजन थाळी दि.29/4/2021 पासून सुरू करण्यात आली या प्रसंगी भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव. सचिन शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून उपक्रम सुरू करण्यात आला या वेळी उपस्थित वडगाव पान सरपंच साईनाथ थोरात ,राहुल दिघे ,लोणी खुर्द येथील शरद आहेर ,राहुल घोगरे सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गाढे ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद संजय कोल्हे ,सतीश वाळुंज ,अमोल गायकवाड ,राहुल गायकवाड ,सागर गुप्ता सुभाष थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते
तरी वरील उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे