चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक यांचे शिल्प …!
सर्वप्रथम आज चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक यांची 2325 वी जयंती आहे ..
त्यानिर्मित्य सर्व भारतीयांना सम्राट अशोक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा …
प्राचीन बौध्द संस्कृतीमध्ये चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक यांनीच सर्वप्रथम लेणी कोरलेली आहे…
84000 स्तुप / चैत्य निर्माण केलेले आहेत…
स्तुपासमोर धम्मस्तंभ निर्माण केलेले आहेत…
जगात सर्वप्रथम आपले संविधान प्रस्तरावर शिलालेखाद्वारे लिहुन आम जनतेसाठी खुले केलेले आहेत …
चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्यामुळेच आज जगामध्ये आपल्याला प्राचीन बौध्द संस्कृती बघावयास मिळते …
परंतु एवढया मोठया प्रमाणात प्राचीन बौध्द संस्कृती निर्माण करताना सम्राट अशोकांनी आपले स्वत:चे एकही शिल्प
कोरलेले नाही …
सम्राट अशोक यांच्या मनाची केवढी मोठी महानता …..
भारतीय पुरातत्व विभागामार्फत झालेल्या ठिकठिकाणाच्या उत्खननामध्ये सम्राट अशोक यांची आतापर्यत पाच शिल्ये मिळालेली आहेत …
तेलंगणातील अमरावती येथे एक ,
तेलंगणातील अमरावती जवळील जग्गयापेठ येथे एक ,
कर्नाटकातील सन्नतीमध्ये दोन ,
आणि तक्षशिला येथे एक…
असे एकुण सम्राट अशोक यांची पाच शिल्प उत्खननामध्ये मिळालेली आहेत …
सम्राट अशोक यांची ही सर्व शिल्पे सातवाहनकालीन आहेत ..
तेलंगणातील अमरावती आणि जग्गयापेठ येथील शिल्पामध्ये शंभर टक्के साम्य आहे ..
हे दोन्ही शिल्प महास्तुपाजवळच उत्खननाध्ये प्राप्त झालेली आहेत…
या शाल्पावरुनच भारतीय पोस्ट विभागाने सम्राट अशोक यांचे तिकीट प्रसारीत केलेली आहे…
सन्नतीमध्ये सम्राट अशोक यांच्याशिल्याखाली धम्मलिपीमध्ये
” राया अशोक ” म्हणजेच ” राजा अशोक ” असे कोरलेले आहे …
सम्राट अशोक यांचे शिल्प फ्रान्समधील पॅरीशच्या गुईमेट संग्रहालयात सुरक्षित आहे …
सम्राट अशोक यांचे जग्गयापेठ येथील शिल्प चेन्नई येथील सरकारी संग्रहालयामध्ये सुरक्षित आहे …
सन्नती येथील शिल्प सन्नती येथेच सुरक्षित आहेत …
प्राचीन बौध्द संस्कृती निम्राण करताना स्वत:चे शिल्प न निर्माण करता फक्त आणि फक्त प्राचीन बौध्द संस्कृतीच निर्माण करणा~या चक्रवती प्रियदर्शी सम्राट अशोक यांना त्यांच्या 2325 व्या जयंतीनिमित्य पंचांग प्रणाम आणि त्रिवार
वंदन …. !!!
माईनी रामटेके
9970188867