राज्यातील दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
यावर्षी परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावे यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमताने निर्णय झाला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर मेअखेरीस १२ वी परीक्षा घेण्याबाबत विचार केला जाईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड : आता शालेय शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतोय की, दहावीच्या परीक्षा रद्द करून, अंतर्गत मूल्यांकन करून ते पुढे कसे गेले पाहिजे, याबाबत आम्ही चर्चा करू.
ऑनलाईन परीक्षा घेतल्यास ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी होईल. त्यामुळे परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.