केन्द्रीय मानवाधिकार संगठन,नई दिल्ली शाखा जळगाव से zoom मिटिंग द्वारा स्नेह मिलन

0
227

*केंद्रीय मानवIधिकार संघटना नवी दिल्लीच्या- उत्तर महाराष्ट्र, जळगाव, बुलढाणा व मुंबई जिल्ह्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा ऑनलाइन स्नेहमिलन सोहळा संपन्न*

*दिनांक 18 एप्रिल 2021* रोजी केंद्रीय मानवाधिका संघटना नवी दिल्लीच्या जळगाव, बुलढाणा व मुंबई कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी यांचे स्नेहमिलन *Zoom Meeting* द्वारे ऑनलाईन *रविवार* *सकाळी 11 am ते 12.30 pm* वाजता घेण्यात आले.
सदर बैठकीला केंद्रीय मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले , राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. शिवचरण उज्जैनकर, जळगाव , बुलढाणा आणि मुंबई या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय संघटन सचिव डॉ.शिवचरण उज्जैनकर सर यांनी केले. प्रास्ताविकात केंद्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्रात रक्तदान शिबिर, मास्क वाटप, ऑनलाइन प्रबोधन लेक्चर्स, कोरोना योद्ध्यांचा सन्मान इत्यादीं उपक्रमांच्या माध्यमातून उत्कृष्टरित्या कशा प्रकारे कार्य करत आहे याचे मार्गदर्शन त्यांनी केले. जळगाव जिल्हा कार्यकारिणीने आयोजित केलेल्या खानदेशची रणरागिनी पुरस्कार सोहळ्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले.जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. अजय पाटील, जिल्हा सचिव प्रा. राजकुमार कांकरिया, जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती साधनाताई लोखंडे, जळगाव तालुकाध्यक्ष श्री किशोर पाटील, श्रीमती ज्योती राणे यांचे देखील विशेष कौतुक त्यांनी केले.
प्रास्ताविकानंतर स्नेह मिलनाच्या सोहळ्यांमध्ये मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते डॉ. मिलिंदजी दहिवले यांनी केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या विविध देशव्यापी कार्यांची माहिती दिली.कोरोना सारख्या भयंकर आजारांमध्ये सामान्य जनतेला प्रबोधनातून व प्रत्यक्ष मदतीतून कसे धैर्य दिले जाऊ शकते आणि त्यामध्ये मानवIधिकार कार्यकर्त्यांचे योगदान कशाप्रकारे सार्थ लागत आहे याविषयी मार्गदर्शन केले. केंद्रीय मानवIधिकारIचे जिल्हास्तरीय ऑफिस व जन सहायता कक्ष स्थापन करण्याची सूचना देखील त्यांनी केली. सर्व कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांना आगामी काळात जनसेवेसाठी सुसज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री संजू भटकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संयम, सामंजस्य ठेवून केंद्रीय मानवIधिकार संघटनेचे महत्व शासन दरबारी अथवा विविध अन्य ठिकाणी कशाप्रकारे उपयोगी आणले जाऊ शकते याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. मुंबई विभागीय अध्यक्ष श्री सुभाषजी कोळी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात राबवित असलेल्या विविध जनसेवाच्या कार्योबद्दल उत्कृष्ट सादरीकरण केले. कोरोना काळात विविध समाज घटकांना कशाप्रकारे केंद्रीय मानवाधिकार संघटना मुंबई विभागाच्यावतीने कशी मदत केली जात आहे याची सविस्तर माहिती दिली. आणि व्हॅक्सिनेशन असेल, पेशंटला मदत असेल यासाठी हातभार लावण्याकरता सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले. बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री एस. के. पाटील यांनी देखील बुलढाणा कार्यकारणीच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बुलढाणा उपाध्यक्ष श्री अमरकुमार तायडे यांनी देखील कोरोना काळातील मदती विषयी आव्हान केले.
स्नेहसंमेलनाच्या शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. अजय पाटील यांनी केले. आभार प्रदर्शनाच्या वेळी बोलताना त्यांनी डॉ.मिलिंदजी दहिवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि त्यांच्या सूचनांनुसार आगामी काळात उपक्रम राबवू या विषयी ग्वाही दिली. तसेच त्यांनी संघटनेचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ.शिवचरणजी उज्जैनकर त्यांच्याकडून वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शन व सहकार्य करता त्यांचे देखील आभार व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्रात चोख भूमिका बजावत असलेले श्री संजू भटकर, मुंबई जिल्हाध्यक्ष श्री सुभाष कोळी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री एस. के. पाटील आणि उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार कार्यक्रमाचे आयोजक म्हणून जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. अजय पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हासचिव प्रा. राजकुमार कांकरिया यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जळगाव जिल्हा उपाध्यक्षI श्रीमती साधनाताई लोखंडे, जळगाव जिल्हा सहसचिव डॉ. प्रशांत बडगुजर, विधी सल्लागार ॲड. अजित वाघ, उत्तर महाराष्ट्र सचिव श्री राजेश पोतदार ,ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ.एस आर वराडे, श्री मधुकर पोतदार, मुंबई कार्यकारिणीतील पदाधिकारी श्री मोहन सौंदाणे, जळगाव तालुकाध्यक्ष श्री किशोर पाटील, रावेर तालुकाध्यक्ष श्री महेंद्र महाजन, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष श्री विनायक वाडेकर, जळगाव तालुकासचिव श्री अजयकुमार अशोकराव पाटील, जळगाव तालुका उपाध्यक्षI श्रीमती ज्योती राणे मॅडम, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष श्री मनोहर पवार, बुलढाणा जिल्हा सचिव श्री गजानन क-हे, बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री बबन महामुने, कोषाध्यक्ष श्री सुनील मुंधोकार, श्री निखील मोरे, श्री प्रवीण क्षीरसागर, श्री संतोष तायडे आदी ज्येष्ठ मान्यवर व सहभागी सर्व पदाधिकारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here